Pimpri News: बांधकाम कामगारांची ‘पाच हजार अर्थसहाय्य’ ही योजना मार्गी लाऊ – अजितदादा पवार

Pimpri News: बांधकाम कामगारांची ‘पाच हजार अर्थसहाय्य’ ही योजना मार्गी लाऊ – अजितदादा पवार


Pckhabar- महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेतून अवजारे खरेदीसाठी सुमारे पाच हजार रुपये प्रत्येक कामगारांना देण्यात येत होती . सध्या बंद असलेली योजना पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आज दिले असल्याची माहिती कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे आज पुणे येथे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार व राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांची भेट घेऊन बांधकाम कामगारांच्या मागणीकडे लक्ष वेधले यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने, भास्कर राठोड, सुखदेव कांबळे, गौतम हातागळे आदी उपस्थित होते.

सदरची योजना २०१७ ते २०१९ या वर्षाच्या कालावधी पर्यत ५,०८,७८९ बांधकाम कामगारानां याचा लाभ झाला मात्र कालांतराने हि योजना बंद करण्यात आली आहे. वास्तविक या अर्थ सहाय्यामुळे महाराष्ट्र राज्यातील कामगारांनी यात सहभागी होऊन नोंदणी प्रमाणात मोठ्या प्रमाणात झाली आणि त्यातून अवजारे खरेदी साठी मदत झाली. ही योजना पुन्हा नव्याने सुरू करण्यात सुरू करण्यात आली तर महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांमध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण होऊन राज्यातील महा विकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने हा महत्वाचा निर्णय होणार आहे.
तरी आपणास विनंती की अवजारे खरेदीसाठी पुन्हा अर्थसहाय्य योजना सुरू करण्यात यावी अशी पत्राद्वारे चर्चा करण्यात आली.

यावेळी अजित दादा पवार यांनी लवकरच आपण कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी बैठक घेउन याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन यावेळी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *