Chinchwad News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीची रुग्णालयात जाऊन केली विचारपूस

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीची रुग्णालयात जाऊन केली विचारपूस

पिंपरी – भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर बाणेर येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (शनिवार) सकाळीच आमदार जगताप यांची रुग्णालयात जावून भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. उपचाराबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली.

उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, योगेश बहल, आमदार जगताप यांचे ज्येष्ठ बंधू विजय जगताप उपस्थित होते.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास कामांच्या उद्घाटनासाठी आणि भूमीपूजनासाठी आज शहर दौऱ्यावर येणार होते. मात्र, कालच उपमुख्यमंत्री पवार यांचा शहर दौरा रद्द झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सांगितले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *