Pimpri News: आदियाल स्पोर्ट क्लब तर्फे आयोजित भीम बाणा’तील भीम गीतांनी डॉ. आंबेडकरांना अभिवादन 

Pimpri News: आदियाल स्पोर्ट क्लब तर्फे आयोजित भीम बाणा’तील भीम गीतांनी डॉ. आंबेडकरांना अभिवादन

Pckhabar- गायक प्रसेनजीत कोसंबी, ‘बाळू मामाच्या नावानं चांगभलं’ फेम अभिनेत्री स्वाती धोकटे, ‘केसामध्ये गजरा’ फेम अभिनेत्री शीतल चोपडे, पुणे फेस्टिव्हल प्रथम विजेता गायक निशांत गायकवाड आणि प्रसिद्ध निवेदक मुराद काझी आपल्या आगळ्यावेगळ्या ढंगात भीमगिते करीत वातावरण भारावून टाकले. भीम गीतांवर रसिकांनी अक्षरशः ठेका धरला होता.

निमित्त होते पिंपळे गुरव येथील अमरसिंग आदियाल स्पोर्ट क्लबच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भीम बाणा या कार्यक्रमाचे. दरम्यान, उपस्थित जनसमुदाया समवेत सामूहिक वंदना घेण्यात आली.

यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र राजापुरे, माजी नगरसेविका शोभाताई आदियाल, उद्योजक माऊली जगताप, माजी नगरसेवक शशिकांत कदम, महेश जगताप, सागर आंघोळकर, राहुल जवळकर, नवनाथ जांभूळकर, उषाताई मुंडे, कावेरी जगताप, उर्मिला देवकर, जिजाबाई कवाष्टै, विजय गायकवाड, तानाजी जवळकर, शिवाजी पाडुळे, अमरसिंग आदियाल, रमेश काशीद, अतुल काशीद, नितीन काशीद, गणेश जगताप, राजेंद्र राजापुरे, बाळासाहेब देवकर, विशाल गायकवाड, पुनाजी रोकडे, दिलीप कांबळे, शशिकांत दुधारे, मुकेश पवार, वैशालीताई जवळकर, राहुल काकडे, ऍड. नितनवरे, वाकोडे साहेब, निखिल कुमार, मानसिंग आदियाल, स्वप्निल महाराज कदम, हुसेन मुलांनी, अनिस पठाण, विकास पडळकर, आशिष सोनवणे, प्रवीण सावंत आदी उपस्थित होते.

गायक प्रसेनजीत कोसंबी यांनी गायलेल्या माझा भीमराव, भीमराव कडाडला, त्यानं माणसाला माणुसकी दावली, निर्भीड बाणा तोफखाणा, सिंहापरी गर्जला भुवनी आदी भीमगीतांवर रसिकांनी अक्षरशः ठेका धरला. संपूर्ण वातावरण भीममय झाले होते. निशिकांत गायकवाडने गायलेल्या दोनच राजे इथे गाजले, तलवार फिरली गरगर या गाण्यांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमरसिंग आदियाल यांनी केले. ते म्हणाले, की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य महान आहे. बाबासाहेबांच्या विचारांना जगात तोड नाही, म्हणून सर्व जनतेने बाबासाहेबांचे विचार अंगीकारले पाहिजेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *