Pimpri News: खासदार श्रीरंग बारणे यांच्या निधीतून रहाटणीत सिमेंट क्राँकीट रस्त्याचे काम सुरु

Pimpri News: खासदार श्रीरंग बारणे यांच्या निधीतून रहाटणीत सिमेंट क्राँकीट रस्त्याचे काम सुरु

Pckhabar- मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या खासदार स्थानिक विकास निधीतून रहाटणीतील सुयोग कॅालनीत सिमेंट क्राँकीट रस्त्याचे काम सुरु झाले आहे. या कामाचे खासदार बारणे यांच्या हस्ते भूमीपूजन झाले. 10 लाख रुपयांचा हा क्राँकीट रस्ता आहे.

माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, बाबासाहेब त्रिभूवन, सविता खुळे, अनिता तुतारे, शिल्पा अनुपम, विजय साने, दिपक ढोरे, गोरख पाटील, अंकुश कोळेकर, प्रदिप दळवी, कानिफनाथ तोडकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार स्थानिक विकास निधीतून पिंपरी-चिंचवड शहरातील विविध गृहनिर्माण सोसायट्यांना जाणारा रस्त्याचे काम केले जात आहे. अरुंद रस्ते सिमेंट काँक्रीटचे करुन नागरिकांना सुविधा दिली जाते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”महापालिका स्तरावर स्थानिक लोकप्रतिनीधी काम करतात. रहाटणीतील नागरिकांनी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याबाबत मागणी केली होती. त्याअनुषंगाने रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. ठेकेदाराने चांगल्या दर्जाचे काम करावे”.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *