Maharashtra News : महत्वाचा निर्णय; फ्लॅट विकण्यासाठी घरमालकाला सोसायटीची परवानगी घ्यायची गरज नाही
Pckhabar- ‘घर मालकाला स्वतःचा घराचा हक्क आहे. ते घर कोणाला विकावे हा त्याचा निर्णय आहे. जर एखाद्या घरमालकाला घर विकायचा असेल तर त्याकरिता सोसायटीची परवानगी कशासाठी? घर मालक आणि खरेदीदार यांच्यात सौदा झाला तर परवानगीची काहीच गरज नाही, अशी महत्त्वाची घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. आव्हाड यांच्या या निर्णयामुळे घर विक्री करताना घरमालकांना त्याचा फायदा होणार आहे.

फ्लॅट विक्रीसाठी सोसायटीची परवानगी लागत होती, पण आता आव्हाड यांनी ही प्रथा मोडीत काढली आहे. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. घराची विक्री करताना, त्याचा व्यवहार करताना सोसायटीची परवानगी लागत असल्याने वेळ वाया जात होता, आता या निर्णयामुळे घरमालकांना त्यांचे घर विकताना कमी त्रास सोसावा लागणार आहे.











Leave a Reply