Pimpri News: शहरात रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे कार्यालय त्वरित सुरू करा, काँग्रेसची मागणी

Pimpri News: शहरात रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे कार्यालय त्वरित सुरू करा, काँग्रेसची मागणी

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने नुकतेच पिंपरी-चिंचवड शहरात रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे कार्यालय सुरू करणे बाबत पुणे येथील कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती कविता जावळे यांना एक निवेदन देण्यात आले.

“या निवेदनाद्वारे शहरात असणारी एकंदरीत परिस्थिती स्वयंरोजगार व रोजगाराच्या बाबतीमध्ये युवकां च्या असणाऱ्या अडचणी व त्या सोडवण्यासाठी असणारी शासकीय यंत्रणा यांचा समन्वय साधण्यासाठी कौशल्य विकास विभागातर्फे चालविण्यात येणारे रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे करण्यापूर्वी पिंपरी येथे कार्यरत होते पण ते गेल्या काही वर्षापासून बंद आहे ते पुन्हा सुरू करावे किंवा नवीन जागेत ते सुरू करून या वाढत्या बेरोजगारीच्या काळात युवकांना दिलासा देणे गरजेचे आहे” असे रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष विशाल सरोदे यांनी सांगितले.

निवेदनात पिंपरी-चिंचवड शहर औद्योगिक नगरी असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कुशल अकुशल कंत्राटी तसेच शिकवू कामगारांची गरज निर्माण होत असते विभागाच्या रोजगार व स्वयंरोजगार कार्यालया च्या माध्यमातून रोजगार मेळावे स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले जात असते यामुळे युवावर्गाला मोठा दिलासा मिळून नोकऱ्या प्राप्त होत असतात तसेच बेरोजगार युवकांची नोंदणी व्यवसाय प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात.

शहरातील वाढती लोकसंख्या, वाढती युवा लोकसंख्या व वाढती बेरोजगारी यांची समस्या लक्षात घेता युवकांना रोजगार क्षेत्रांमध्ये दिलासा देणारे व मोलाची भूमिका बजावणारे कौशल्य विकास विभागाचे रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र कार्यालय त्वरित सुरू करावे, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे रोजगार व स्वयंरोजगार विभागाने केली आहे.
पुणे येथील कौशल्य विकास विभागाच्या कार्यालयात याबाबतचे निवेदन देताना रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे शहराध्यक्ष विशाल सरोदे व कार्याध्यक्षा सुप्रिया पोहरे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *