Nigdi News : रुपीनगरमध्ये श्रीरामनवमी उत्साहात साजरी

Pckhabar- श्रीराम सेवा मंडळ सार्वजनिक ट्रस्ट, रुपीनगर यांच्यामार्फत श्रीराम मंदिर रुपीनगर येथे भगवान श्रीरामप्रभू जन्मोत्सव सोहळा अतिशय उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पाडण्यात आला.

सकाळी ६ वाजता श्रीरामप्रभूंच्या मूर्तीस अभिषेक करून या सोहळ्याची सुरुवात झाली. त्यांनतर श्री. शिवाजी महाराज वाघ (देवाची आळंदी) यांचे सुश्राव्य कीर्तन आणि दुपारी १२ वाजता पाळणा व जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
श्रीरामनवमीनिमित्त संजय काळोखे व मल्लिकार्जुन अंकलकोटे यांच्यातर्फे महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते. आशिष मालूसरे, नयन भोसले, शुभम जगताप,ओमकार काळोखे, अमोल बनसोडे, विजय मराठे, शुभम लोहारे, रोहित सावंत, संदीप मोरे, फिरदौस तांबोळी, प्रदीप जैस्वाल, मल्लीकार्जुन प्यारसाबादी इ. युवा कार्यकर्त्यांनी अन्नदानासाठी परिश्रम घेतले.
प्रसंगी माजी नगरसेवक शांताराम बाप्पु भालेकर, प्रविण भालेकर, पंकज भालेकर, माजी नगरसेविका पोर्णिमा सोनवणे, संगिता ताम्हाणे, योध्दा प्रतिष्ठानचे अमोल भालेकर, शांताराम दगडु भालेकर,सुखदेव नरळे,आप्पा सोनवणे,धनंजय वर्णेकर,भाऊसाहेब काळोखे,सुरेश कदम,रघुनंदन घुले,शरद भालेकर,विशाल मानकरी,विलास भालेकर,रुपीनगरमधील जेष्ठ नागरिक संघातील सर्व सभासद उपस्थित होते.
ट्रस्टचे अध्यक्ष त्रिंबक महादेव गायकवाड, उपाध्यक्ष सुदाम शंकर शिंदे, सेक्रेटरी तानाजी देवराव लोहारे, खजिनदार प्रकाश रामसिंग परदेशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.










Leave a Reply