माजी महापौर रंगनाथ फुगे यांचे कोरोनामुळे निधन
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराचे माजी महापौर रंगनाथ फुगे ( वय 80) यांचे आज (मंगळवारी) कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन विवाहित मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
फुगे यांना चार दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.
फुगेवाडी प्रभागातून रंगनाथ फुगे काँग्रेसच्या चिन्हावर पिंपरी-चिंचवड महापालिकेत निवडून आले होते. तीनवेळा त्यांनी फुगेवाडीचे प्रतिनिधित्व केले. 1996 ते 1997 दरम्यान त्यांनी शहराचे महापौरपद देखील भूषविले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.










Leave a Reply