Pimpri Educational News: रोटरी युथ बिल्डर शिप अवॉर्ड अंतर्गत उमेद व आनंदी शिक्षक कार्यक्रम कन्या विद्यालय पिंपरी येथे संपन्न

Pckhabar- रयत शिक्षण संस्थेचे कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे इथे रोटरी युथ बिल्डर शिप अवॉर्ड अंतर्गत उमेद व आनंदी शिक्षक या कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये रोटरी क्लब कोथरूड पुणे यांचे अध्यक्ष सत्यजित चितळे तसेच सभासद उज्वल तावडे व उर्मिला हळदणकर यांनी सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमात प्रथम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा शेटे व पर्यवेक्षिका उर्मिला पाटील व उपस्थित मान्यवर यांनी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील व त्यांच्या सहधर्मचारिणी सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळेस विद्यालयातील सर्व अध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीनी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मनोगत व्यक्त करताना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा शेटे यांनी रोटरी क्लब कोथरूड पुणे यांनी वेळोवेळी शाळेस केलेल्या मदतीचा उल्लेख केला व विद्यार्थिनी आनंदी कसे राहावे याबद्दल मार्गदर्शन केले तसेच मुख्याध्यापिका शारदा शेटे पर्यवेक्षिका उर्मिला पाटील यांनी सर्व मान्यवरांचा सत्कार केला. या कार्यक्रमास महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पांडुरंग गायकवाड हे उपस्थित होते व त्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.
उमेद अंतर्गत उर्मिला हळदणकर यांनी विद्यार्थ्यांनींना मार्गदर्शन केले विद्यार्थिनींनी ध्येय ठरवून ते साध्य करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करावे, हे सांगितले तसेच आपले ध्येय हे SMART असावे हे सांगून SMART या शब्दातील प्रत्येक अक्षराचा अर्थ सांगितला. उज्वल तावडे यांनी विद्यार्थिनींना त्यांची ध्येय विचारून हसत खेळत त्यांच्याकडून काही कृती करून घेतल्या तसेच विद्यार्थ्यांना मनाची व्याख्या सांगितली.
आनंदी शिक्षक अंतर्गत उर्मिला हळदणकर यांनी शिक्षकांनी आनंदी कसे राहावे हे सांगितले शिक्षक आनंदी असेल तर त्याचा अध्यापनावर कसा परिणाम होतो हे सांगितले तसेच आनंदी राहण्यासाठी त्यांनी पंचसूत्रीचा अवलंब करण्यास सांगितले.
तसेच उर्मिला हळदणकर यांच्या स्नुषा आरती हळदणकर यांनी शाळेस रु 5000 देणगी दिली व उज्वल तावडे यांनी गरीब विद्यार्थिनींना शैक्षणिक सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमात विद्यालयाच्या पर्यवेक्षिका उर्मिला पाटील यांनी सर्वांचे आभार मानले व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा निकम यांनी केले अशाप्रकारे कार्यक्रम संपन्न झाला.










Leave a Reply