Pavana Dam news पाण्याचा प्रश्न मिटला, धरणात 75 टक्के पाणीसाठा

Pavana Dam news पाण्याचा प्रश्न मिटला, धरणात 75 टक्के पाणीसाठा

Pckhabar- पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मावळातील पवना धरणातील पाणीसाठा 74.64 टक्के झाला आहे. 1 जूनपासून 39.35 टक्यांनी धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे.

पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची भिस्त पवना धरणावर अवलंबून आहे. पावसाळ्याचे जून, जुलै दोन महिने ओढ दिल्यावर ऑगस्टच्या सुरुवातीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे. यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.

गेल्या 24 तासात धरण क्षेत्रात 26 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. 2.11 टक्क्यांनी वाढ झाली असून 1 जूनपासून 1219 मिली मीटर पाऊस धरण क्षेत्रात झाला आहे. पाणीसाठ्यात 39.35 टक्के वाढ झाली आहे.
धरणातील पाणी साठ्यात वाढ होत आहे. यामुळे मावळ, पिंपरी-चिंचवड मधील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

पवना धरणातील पाणी साठ्याची आजची आकडेवारी!

#गेल्या 24 तासात झालेला पाऊस = 26 मिमी

#1 जूनपासून झालेला पाऊस = 1219मिमी

#गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस =
3119 मिमी

#धरणातील सध्याचा पाणीसाठा = 74.64% टक्के

#गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = 99.14% टक्के*

#गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= 2.11% टक्के

# 1 जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = 39.35% टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *