Talegaon Dabhade News : श्री स्वामी समर्थ प्रकटदिनामित्त ग्रंथाचे वाचन, हवन, पालखी सोहळा, महाप्रसाद

श्री सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन
Pckhabar- श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त श्री सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांनी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

श्री स्वामी समर्थ मंत्राचे हवन, श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे वाचन व हवन पालखी सोहळा मिरवणूक, आरती, महाप्रसाद आदी विविध धार्मिक कार्यक्रमांनी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन भक्तिमय वातावरणात पार पडला. स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त सप्तशृंगी माता मंदिर परिसरात नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिराचा गाभारा फुलांच्या आकर्षक सजावटीने सजविण्यात आला होता.

पालखी मार्गावर भाविकांनी अनेक ठिकाणी फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. जागोजागी पालखीचे पूजन आणि स्वागत करण्यात येत होते. दर्शनासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. भाविकांनी पालखी खांद्यावर घेण्याचा लाभ घेतला.

पालखी सोहळ्यात जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे, मुख्य आयोजक श्री सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे प्रमुख गणेश काकडे, राष्ट्रवादीचे मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, संतोष खांडगे, किरण काकडे, आशिष खांडगे यांच्यासह मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते.
इंद्रायणी वसाहत, आनंदनगर, वनश्रीनगर, मनोहरनगर, श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात पालखी सोहळा पार पडला.
श्री सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे प्रमुख आणि प्रसिद्ध उद्योजक गणेश काकडे म्हणाले ” कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे दोन वर्षे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. दोन वर्षे स्वामींच्या सेवेपासून वंचित होतो. यंदा मात्र, स्वामी समर्थ महाराजांच्या आशिर्वादाने कोरोनाचे संकट कमी झाले आहे. त्यामुळे यावर्षी मोठ्या उत्साहात श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन साजरा करण्याचे नियोजन केले. त्यानुसार स्वामींचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वामी समर्थ महाराज यांची सेवा केल्यामुळे मनाला मोठे समाधान लाभले. ”










Leave a Reply