Pimpri News: ‘थाली बजाओ, खुशिया मनाओ’
इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचा अनोखा आनंदोत्सव

Pckhabar- युवासेनाप्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेच्या माध्यमातून चिखली येथील साने चौकात केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढीच्या विरोधात रविवारी थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले. यानिमित्त अनोख्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा करत या दरवाढीचा निषेध करण्यात आला.
याप्रसंगी सचिन सानप, अनिल सोमवंशी, राहुल भोसले यांनी महागाईचा निषेध नोंदविला. यावेळी युवासैनिकांनी इंधन दरवाढ लादणाऱ्या भाजप सरकारचे प्रतिकात्मक अभिनंदन करून नागरिकांच्या भावनांचा केंद्र सरकारने विचार करावा व इंधन दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अशी जोरदार मागणी थाळी वाजवत केली.

या आंदोलनाचे नियोजन युवासेना शहर प्रमुख अजिंक्य उबाळे, युवासेना भोसरी विधानसभा अधिकारी अमित शिंदे , विधानसभा समन्वयक स्वप्नील शिरसाठ, सागर रहाणे, प्रसिद्धी प्रमुख सार्थक दोषी, उपविधानसभा अधिकारी सुनील समगीर, सुरज दाभाडे, अभिजित गिरी, अभिषेक सुरवसे, यांनी केले. विभाग प्रमुख सतीश दिसले, नितीन बोन्डे , संजय गाढवे, महिला आघाडीच्या साधना काशीद, आशा भालेकर, जनाबाई गोरे तसेच सुमन तांबे, रोहित काशिद, ज्योती तांबे, तुलसी सांगडे, अशोक गायकवाड, प्रताप डेंगळे, प्रज्वल खोसे, वैभव काशिद, आबा पांचाळ, यांच्यासह युवासेना, शिवसेना, महिला आघाडीच्या आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
याबाबत बोलताना शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सुलभा उबाळे म्हणाल्या की, महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असतानाही भाजप मात्र इतर राज्यातील निवडणुकीत मिळालेला विजय साजरा करत सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे.










Leave a Reply