Talegaon Dabhade News :
श्री स्वामी समर्थ यांच्या जयंतीनिमित्त पालखी सोहळा व महाप्रसादाचे आयोजन
सिध्दीविनायक प्रतिष्ठानतर्फे सोहळ्याचे आयोजन

Pckhabar- अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) श्री स्वामी समर्थ यांच्या जयंती उत्सवानिमित्त सिध्दीविनायक प्रतिष्ठानतर्फे रविवारी ( दि. 3) रोजी पालखी सोहळा व महाप्रसादाचे तळेगाव दाभाडे येथे आयोजन करण्यात आले आहे.

तळेगाव स्टेशन भागातील इंद्रायणी कॉलनी सप्तशृंगी माता मंदिरात रविवारी दु. ३.३० वा. श्री स्वामी समर्थ मंत्राचे हवन, दु. ३.४५ ते ५.०० वा. श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे वाचन व हवन, सायं. ५.०० वा. ते ८.३० वा. पालखी सोहळा, मिरवणुक तर रात्री ८.३० वा. आरती व महाप्रसाद होणार आहे.
याबाबत सिध्दीविनायक प्रतिष्ठानचे प्रमुख
आणि प्रसिद्ध उद्योजक गणेश मोहनराव काकडे माहिती देताना म्हणाले” प.पु. गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या कृपाशिर्वादाने स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त रविवारी पालखी सोहळा व महाप्रसादाचे आयोजन केले आहे. या सोहळ्यासाठी परिसरातील जास्तीत- जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ”










Leave a Reply