प्रसिद्ध गायक पंडित जसराज यांचे निधन
Pckhabar- भारतीय शास्त्रीय संगीताचे दिग्गज पंडित जसराज यांचे निधन झाले आहे. जसराज यांनी अमेरिकेत अखेरचा श्वास घेतला. पंडित जसराज यांच्या जाण्यामुळे संपूर्ण संगीत आणि कला विश्वावर शोककळा पसरली आहे.
पंडित जसराज यांचा जन्म 24 जानेवारी 1930 ला झाला. शास्त्रीय गायकांपैकी ते एक भारतातील प्रसिद्ध गायक आहेत. जसराज हे मेवाती घराण्यातील आहेत. जसराज हे जेव्हा चार वर्षांचे होते त्यांच्या वडिलांचं म्हणजे पंडित मोतीराम यांचं निधन झालं. त्यानंतर मोठा भाऊ पंडित मनीराम यांनीच जसराज यांची जबाबदारी घेतली आणि त्यांना लहानाचं मोठं केले.










Leave a Reply