Pimpri News: आम आदमी पार्टीचे निषेध आंदोलन

Pimpri News: आम आदमी पार्टीचे निषेध आंदोलन

Pckhabar- आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहर समिती तर्फे आज दि 31मार्च रोजी सकाळी 10:00 वाजता भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक पिंपरी येथे काल झालेल्या भ्याड हल्ल्या बद्दल निषेध आंदोलन करण्यात आले.

आपण सर्व भारतीय नागरिकांनी पाहिल काल दुपारी दिल्ली मध्ये दिल्लीचे मा. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या शासकीय निवास स्थानी भाजप प्रेरित गुंडांनी दिल्ली च्या पोलिसां समोर आणि निवासस्थाना जवळ तोडफोड केली हे निंदनिय कृत्य आहे , विचाराची लढाई विचाराने लढली पाहिजे. पंजाब मध्ये आम आदमी पार्टीचा दणदणीत विजय आणि राष्टीय पातळीवर पक्षाचा वाढता प्रभाव भाजपला मोठी डोकेदुखी होत असल्याने आणि भारतीय नागरिक धर्म , जात , पंत , भाषा , लिग , अस्मिता , प्रांत या विचारणा मागे टाकुन केजरीवाल दिल्ली मॉडेल म्हणजे लाईट ,पाणी ,शिक्षण , रोजगार , व्यवसाय , पायाभूत सुविधा आणि देशाचा विकास हे राजकारण स्वीकारत आहेत.

धर्माचा आधार घेऊन सत्तेत बसणाऱ्या पक्षांना आता त्रास होत असल्याने काल जो प्रकार झाला याला आपण धार्मिक , कट्टरता वाद पक्षांना घाम सुटला आहे आणि भविष्यात सत्तेवर येण्यासाठी आम आदमी पक्ष बाधा येऊ शकतो हे मनात ठेवून भाजप च्या गुंडांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानी घातपात घडवण्याचा बेत केला होता.

पिंपरी चिंचवड निषेध आंदोलन मध्ये कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे हे म्हणाले की, मुख्यमंत्री च्या निवासस्थानी जो हल्ला झाला आहे हि एक पहिली पायरी आहे ,भाजप लोकशाही आणि संविधान वर हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे , याचा आम्ही जाहीर निषेध करतो.

आम आदमी पक्षातील कार्यकर्त्यानी मोदी सरकार हाय हाय , अमित शहा हाय हाय , जब जब जुल्मी जुल्म करेंगा सत्ता हे हथियारो से तब तब चपा चपा गुज उठेगा इन्कलाब के नारो से …. आहे नारे देऊन काल झालेल्या कृत्याचा आणि भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध केला.

या आंदोलनात शहरातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी मंडळी चेतन बेंद्रे राज चाकणे , स्वप्नील जेवेळे , एकनाथ पाठक ,ऍड गौतम कुडुक , प्रकाश हगवणे , मोतीराम अगरवाल , ऍड उमेश साठे , भीम मागाडे ,अशोक कोठावळे , सरोज कदम , उमेश थोरात, डॉ योगेश बाफना ,ब्राम्हनंद , मुकेश पोखरकर , निखिल बालीघाटे, आशुतोष शेळके , चांद्रमनी जावळे , स्मिता पवार , शिव बोटे , शंकर पवार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *