Delhi News : पालखी मार्गांचे काम मार्गी लावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार
श्रीक्षेत्र देहु येथील शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचेही पंतप्रधान मोदी यांना आमंत्रण

Pckhabar- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे भुमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी झाले. याबद्दल वारकरी संप्रदाय आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज यांच्या शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे आज ( मंगळवार) त्यांची भेट घेत विशेष आभार मानले.

यावेळी वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे तुकोबारायांची पगडी, उपरणे, वीणा, चिपळ्या तसेच गाथा देऊन तसेच तुळशीहार घालुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विशेष सत्कार करण्यात आला व त्यांना श्रीक्षेत्र देहु येथील शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे आमंत्रण दिले.
या शिष्टमंडळात भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले, संत तुकाराम महाराज संस्थान देहुचे अध्यक्ष नितीन मोरे, विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे सदस्य शिवाजी महाराज मोरे आणि मान्यवर उपस्थित होते.










Leave a Reply