Bhosari News: शिवरायांच्या विचारानुसार जनसेवा करा

Bhosari News: शिवरायांच्या विचारानुसार जनसेवा करा

शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर यांचा शिवभक्तांना सल्ला

Pckhabar-शिवजयंती साजरी करीत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अंगभूत गुणांना अंगिकारून जनतेची सेवा करावी. त्यांचे प्रश्न सोडवत सामाजिक बांधिलकीतून काम करण्याचा सल्ला शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी दिला.

चिखली-साने चौक येथिल जाणता राजा प्रतिष्ठान शिवजयंती उत्सव समिती आणि शिवसेना शाखा मोरेवस्ती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवजयंती उत्सवात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. महिला आघाडी संपर्क संघटिका वैशाली सूर्यवंशी, भोसरी विधानसभा संपर्कप्रमुख केसरीनाथ पाटील, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, उपजिल्हा संघटिका वैशाली मराठे, शिवसेना शहरप्रमुख ऍड. सचिन भोसले, निलेश मुटके, उपशहरप्रमुख नेताजी काशिद, भोसरी विधानसभा संघटक रावसाहेब थोरात, जिल्हा समन्वयक राहुल भोसले, युवा सेनेचे सचिन सानप, महिला आघाडी संघटिका साधना काशिद यांच्यासह कल्पना शेटे, राहुल गवळी, संजय गाढवे, सतीश डिसले, सुमंत तांबे, हरिभाऊ लोहकरे, अशोक गायकवाड, देवा कुळकर्णी, विजय शिवपुजे, गणेश बिलोनकर आदी उपस्थित होते.

शिवज्योतीचे पूजन
यावेळी संजीवनी महिला शाहिरी पथकाचा शाहिरी ललकार आणि हा जल्लोष महाराष्ट्राचा आदी कार्यक्रम पार पडले. शिवजयंती दिनी सकाळी शिवनेरीवरून आणलेल्या शिवज्योतीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

काशिद कुटुंबाचे कार्य कौतुकास्पद
नेताजी काशिद आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शिवरायांच्या विचारधारेनुसार जनसेवा सुरु केली आहेत. काशिद कुटुंब स्थानिक जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करीत आहेत. विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. त्यांचे सेवाभावी कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार श्री. मिर्लेकर यांनी काढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *