Pimpri News : जिजाऊंच्या लेकींनी नव्वारी साडी परिधान करून अनवाणी पायाने आणली शिवज्योत

Pimpri News : जिजाऊंच्या लेकींनी
नव्वारी साडी परिधान करून अनवाणी पायाने आणली शिवज्योत

Pckhabar- नारी हीच शक्ती आहे नराची,
नारी हीच शोभा आहे घराची,
तिला द्या आदर,प्रेम, माया,
घरामध्ये आपोआप निर्माण होईल जिव्हाळा

पिंपरी चिंचवड शहरातील लहान मुलींचा समूह(९ ते १४ वयोगट) यावर्षी शिवजयंतीनिमित्त २१ मार्च या शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी ते डांगे चौक हातात मशाल घेऊन नव्वारी साडी परिधान करून अनवाणी पायाने धावत सुमारे ८० किलोमीटर चा टप्पा हा अतिशय् अवघड उपक्रम यशस्वी रित्या पार पाडला आहे.

या उपक्रमाची सुरुवात रात्री 12 वाजता सुरुवात करून नारायणगाव मार्गे पिंपरी चिंचवड येथील डांगे चौक येथे मशाल आणली, आम्हाला या जिजाऊ च्या लेकींचा सदैवच अभिमान वाटतो, शिवाय ही मोहीम यशस्वी रित्यापूर्ण झाल्यानंतर पिंपरी चिंचवड चे पोलिस् कमिशनर कृष्ण प्रकाश यांनी सर्व मुलींना कौतुकाची पाठीवर पडलेली थाप त्यांचा आनंद अजून द्विगुणित करून तसेच मोलाचे दोन शब्द मुलींना सांगून त्यांना प्रोत्साहन दिले.

तसेच या सर्व अवघड उपक्रमात सर्व मुलींना सतत प्रोत्सहन देणारे श्री प्रफुल्ल प्रधान यांचे विशेष करून आम्हा सर्वांना खूप अभिमान वाटतो. खर तर आपल्या मुलांमधील सुप्त गुण हे पालकांनी ओळखले पाहिजे तर ते प्रफुल्ल् सरांनी मुलींना दैनंदिन सराव करताना ओळखून आमच्या मुलींना त्यांनी योग्य रीतीने घडवले आणी वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन केले.

तसेच सर्व मुलींना सदैव मोठ्या भावाप्रमाणे प्रत्येक गोष्टीसाठी मदत तसेच मुलींसाठी कायम धावपळ करणारे कल्पेश धानोकर दादा आणी गुणावंत इंगळे दादा दोघांचे विशेष आभार ..जर हे दोघे या अवघड मोहिमेत नसते तर ही अवघड मोहीम कधीच शक्य झाली नसती.

या यशस्वी मोहिमेत सहभागी झाल्या त्या आई जिजाजू च्या शूर लेकी

· वृदुला पवार

· भक्ती दहिफळे

· सानिका माने

· श्रावणीं पाटील

· नेत्रा ढगे

· श्वेता निमन

· दीप्ती पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *