Mumbai news राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थानी कोरोनाचा शिरकाव

Mumbai news राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थानी कोरोनाचा शिरकाव

Pckhabar-राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन सुरक्षा रक्षकांना करोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
शरद पवार हे मुंबईत भुलाभाई देसाई रोडवरील सिल्व्हर ओक बंगल्यात राहतात. पवार यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांपैकी सहा जणांची रॅपिड टेस्ट करण्यात आली होती. त्यापैकी दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या दोन्ही सुरक्षा रक्षकांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात येणार आहे. हे दोन्ही सुरक्षारक्षक पवारांच्या बंगल्यावरच सुरक्षेचं काम करतात. त्यांचा पवारांशी थेट संबंध येत नाही. मात्र, बंगल्यावरील इतर सुरक्षा रक्षक आणि इतरांच्या संपर्कात हे दोन्ही सुरक्षा रक्षक आले असण्याची शक्यता असून या सर्वांची करोना चाचणी करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, यापूर्वी राज्यातील अनेक मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण झाली होती. राज्याचे कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. तर नातेवाईकांना कोरोना झाल्याने मंत्री शंकरराव गडाख यांनी स्वत:ला क्वॉरंटाइन करून घेतलं होतं. त्याशिवाय अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनाही कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *