News : डॉ. प्रमोद लोहार यांना ‘राष्ट्र गौरव पुरस्कार’ जाहीर
डॉ. लोहार यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते होणार सन्मान

Pckhabar- बेटी बचाओ जन आंदोलनाचे राष्ट्रीय मार्गदर्शक आणि देहूगाव मेडिक्लेअर क्लिनिकचे संचालक डॉ. प्रमोद रामराव लोहार यांना विश्व मैत्री संघाच्या वतीने ‘राष्ट्र गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा 27 मार्च रोजी भोसरी येथे दुपारी तीन वाजता होणार आहे. यावेळी डॉ. लोहार यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.
दरम्यान, डॉ. प्रमोद लोहार यांचे वैद्यकीय क्षेत्रातील आणि बेटी बचाओ जन आंदोलनातील उल्लेखनीय कार्याबद्दल विश्व मैत्री संघाचे डॉ. लालबाबू गुप्ता यांनी डॉ. लोहार यांना ‘राष्ट्र गौरव पुरस्कार’ जाहीर केला आहे.










Leave a Reply