गणपती बाप्पा मोरया ! अर्ध्या एकर शेतीमध्ये साकारली ‘हरित गणरायाची’ प्रतिमा

गणपती बाप्पा मोरया ! अर्ध्या एकर शेतीमध्ये साकारली ‘हरित गणरायाची’ प्रतिमा

Pckhabar- लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपले आहे. गणेश भक्त गणरायाचे आतुरतेने वाट पाहत आहेत. कोरोनाच्या काळात लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी सोलापुरातील बाळे येथील युवा चित्रकार प्रतीक तांदळे याने अर्ध्या एकर शेतीमध्ये सुंदर पर्यावरणपूरक हरित अशी श्रीगणेशाची प्रतिमा अनोख्या पद्धतीने साकारली आहे.

ही प्रतिमा शंभर बाय दोनशे फूट असून एवढ्या कमी वयात प्रतीक तांदळे याने आकर्षक व सुबक कलाकृती केल्यामुळे सोलापूर शहर जिल्ह्यात सर्वत्र या कलाकृतीचे कौतुक होत आहे.

दरम्यान, देशासह जगभरात कोरोना धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. त्यासाठी नियमावलीही जाहीर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *