Maharashtra News : कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू : ज्येष्ठ नेते शरद पवार

Pckhabar- महाराष्ट्रात आता कुठेही गेलो तर माझ्या हातात शासकीय व शैक्षणिक कर्मचाऱ्यांकडून निवेदन मिळतं. त्यात जुन्या पेन्शनचा प्रश्न सर्वात जास्त असतो आणि हा प्रश्न निकाली काढावा अशी तुमची इच्छा आहे. या पेन्शनच्या संदर्भात एका कालखंडामध्ये केंद्र सरकारने काही निर्णय घेतला आणि सरसकट राज्यांकडे सोपवला. त्यामुळेच हा पेन्शनचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. मी स्वत: राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांसोबत या प्रश्नांवर चर्चा करणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

कर्नाळा येथे आयोजित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनाला ज्येष्ठ नेते पवार ( शुक्रवार) उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
ज्येष्ठ नेते शरद पवार पुढे म्हणाले” सणासुदीचा दिवस असताना सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावरून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेशी उपस्थितांची अंत:करणापासून असलेली निष्ठा दिसून येते. खरं म्हणजे, ही महाराष्ट्रातील एक जुनी संघटना आहे. माझा स्वत:चाही या संघटनेशी खूप जुना संबंध आहे. एकेकाळी आचार्य दोंदे यांनी या संघटनेचं नेतृत्व केलं होतं. त्यावेळी या संघटनेमार्फत एक विराट दृष्टी देण्याचं काम होत होतं. नंतरच्या काळामध्ये बरीच स्थित्यंतरं घडली. अशा काळामध्ये पुन्हा एकदा संघटनेचा डोलारा उभा केला पाहिजे, सामाजिक शक्ती एक केली पाहिजे आणि साऱ्या संघटनांना एकसंघ केले पाहिजे, यासंबंधीचा निर्धार शिवाजीरावांनंतर कुणी केला असेल तर तो संभाजीरावांनी. आणि पुन्हा एकदा ही संस्था मजबुतीने उभी राहिली. मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. तसेच तुम्ही सर्वांनी त्यांना साथ दिली त्यासाठी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो.

महाराष्ट्राची नवी पिढी संस्कारक्षम व्हायची असेल तर त्यांना आनंददायी शिक्षणाचा लाभ द्यावा लागेल. ते काम तुम्ही सर्वजण त्यांना फार यशस्वीरीत्या करत आहात. शिक्षकांचे प्रश्न वाटतात तितके सोपे नसतात. पण मार्ग काढायचा असला तर तो कसाही काढता येतो. आज महाराष्ट्रामध्ये शासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे आर्थिक प्रश्न सोडवायचे म्हणजे राज्य सरकारवर बोजा पडत असतो. गेले दोन-तीन वर्षे राज्य सरकारवर संकटावर संकटं येत आहेत. कोरोना, अतिवृष्टीचं आणि दुष्काळाचं संकट या साऱ्या संकटांवर राज्य सरकारने मार्ग काढला. आता परिस्थिती सुधारते आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर आता मार्ग काढता येऊ शकतो, असेही पवार म्हणाले.
महाराष्ट्रात आता कुठेही गेलो तर माझ्या हातात शासकीय व शैक्षणिक कर्मचाऱ्यांकडून निवेदन मिळतं. त्यात जुन्या पेन्शनचा प्रश्न सर्वात जास्त असतो आणि हा प्रश्न निकाली काढावा अशी तुमची इच्छा आहे. या पेन्शनच्या संदर्भात एका कालखंडामध्ये केंद्र सरकारने काही निर्णय घेतला आणि सरसकट राज्यांकडे सोपवला. त्यामुळेच हा पेन्शनचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. मी स्वत: राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांसोबत या प्रश्नांवर चर्चा करणार आहे. १९७८ च्या काळामध्ये मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही असाच एक प्रश्न उद्भवला होता आणि जवळपास दीड महिना सरकारी कर्मचारी संपावर होते. आम्ही त्या प्रश्नाचा अभ्यास करून १५ दिवसांच्या आत त्यावर यशस्वी निर्णय घेतला. त्याप्रमाणेच मला खात्री आहे की, जुन्या पेन्शनचा प्रश्न सुद्धा आम्ही सोडवू. राज्य सरकारशी चर्चा करून ज्या काही प्रश्नांची सोडवणूक करून घ्यायची आहे त्यामध्ये जुनी पेन्शन, संगणक प्रशिक्षणाचा प्रश्न, कॅशलेस वैद्यकीय सुविधा, केंद्रप्रमुख निवड, कोविड कर्तव्यात मृत झालेल्या शिक्षकांना ५० लाखांचं विमाकवच आणि सानुग्रह अनुदान विनाविलंब मिळावे असे प्रश्न महत्त्वाचे आहेत. तसेच २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यात येऊ नयेत, २४ वर्षापेक्षा जास्त सेवा दिलेल्या शिक्षकांना विनाअट निवडश्रेणी देण्यात यावी, हे देखील महत्त्वाचे प्रश्न आहेत. मंत्रिमंडळासोबत होणाऱ्या बैठकीत संभाजीराव तसेच शिक्षकसंघातील दोन-तीन प्रतिनिधी यांनाही आपण समाविष्ट करून घेऊ असे आश्वासन पवार यांनी दिले.







Leave a Reply