Pimpri news शहरात एकाच दिवशी कोरोनाचे 25 बळी, 974 नवे रूग्ण
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात आज रविवारी कोरोनाचे 974 नवे रूग्ण आढळले. शहरात कोरोना रूग्ण संख्येने 35 हजारी ओलांडली आहे. तर पहिल्यांदाच शहरात एकाच दिवशी 25 जणांचा मृत्यू झाला आहे. 604 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
शहरात 35 हजार 397 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 5 हजार 204 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात रविवारअखेर 24 हजार 981 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत शहरातील 624 तर शहराबाहेरील 127 जणांचा मृत्यू झाला आहे.
रविवारी 1 हजार 685 संशयित रूग्णांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. 869 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. 2 हजार 511 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. शहरातील 16 हजार 348 घरांना भेटी देऊन 57 हजार 747 जणांचे सर्व्हेक्षण करण्यात आले.
आज झालेले मृत्यू – नवी सांगवी (पुरूष वय 75), चिंचवडगाव (पुरूष वय 19), निगडी (पुरूष वय 71)
भोसरी (पुरूष वय 88), रूपीनगर (पुरूष वय 43)
, जुनी सांगवी (पुरूष वय 37), वाकड (पुरूष वय 70)
, वाकड (पुरूष वय 74), संत तुकारामनगर, पिंपरी (पुरूष वय 89) , अजमेरा कॉलनी, पिंपरी (पुरूष वय 63, 81),
दापोडी (पुरूष वय 80),दापोडी (पुरूष वय 50)
,दिघी (पुरूष वय 24),चिंचवड (पुरूष वय 47)
, चिंचवड (पुरूष वय 75) , बोपखेल (पुरूष वय 78)
पिंपळे गुरव (पुरूष वय 64) निगडी (स्त्री 65,65)
मोरेवस्ती चिखली (स्त्री वय 75), काळेवाडी (स्त्री वय 60, 70), मोशी (स्त्री वय 65) , पिंपळे निलख (स्त्री वय 80)
येथील रहिवासी आहेत.










Leave a Reply