Pimpri Entertainment News : शहरात जून महिन्यापर्यंत नाटकाचे शनिवार, रविवारचे ‘बुकिंग फुल्ल’


Pimpri Entertainment News :
शहरात जून महिन्यापर्यंत नाटकाचे शनिवार, रविवारचे ‘बुकिंग फुल्ल’

Pckhabar- चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात नाटकांसाठी जून महिन्यापर्यंत शनिवार, रविवारचे ‘बुकिंग फुल्ल’ झाले आहे. आता १०० टक्के प्रेक्षक क्षमतेने नाट्यप्रयोग करण्यास परवानगी मिळाल्याने शहरातील नाट्यगृहांचे ढासळलेले अर्थकारण सावरू लागले आहे.

मार्च ते जून अशा चारही महिन्यांत शनिवार आणि रविवारच्या तारखा नाटकांसाठी ‘बुक’ झाल्या आहेत. सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी मार्च महिन्यापासून जूनपर्यंत शनिवार, रविवार वगळता विविध तारखांसाठी तुरळक ‘बुकिंग झालेले आहे. स्नेहसंमेलनासाठी एखादी तारीख वगळता ‘बुकिंग’ झालेले नाही.

राज्य सरकारने निर्बंध लागू असताना ५० टक्के क्षमतेनेच नाट्यगृहे सुरू होती. नाट्यप्रयोगांना होणारा खर्च परीक्षा सुरू आहेत. भागवता भागवता नाट्य निर्मात्यांच्या नाकीनऊ त्यामुळे सध्या आले होते. त्यामुळे १०० टक्के क्षमतेने नाट्यगृहे नाटकांची प्रेक्षक सुरू करावी, अशी नाट्यकलाकार आणि निर्मात्यांकडून मागणी करण्यात येत होती. त्यानुसार ३ मार्चपासून शहरातील नाट्यगृहे १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यास आयुक्त राजेश पाटील यांनी परवानगी दिली आहे.

दरम्यान, आता पूर्ण नाट्यगृह १०० क्षमतेने नाट्यगृहे सुरू झाल्याने प्रेक्षकसंख्येत वाढ होणार आहे. नाटकांसाठी पूर्वी सरासरी ३०० प्रेक्षक मिळत होते. सध्या सरासरी ३५० प्रेक्षक मिळत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *