Pimpri News : भंगारमालाच्या दुकानात सीसीटीव्ही बंधनकारक

Pimpri News : भंगारमालाच्या दुकानात सीसीटीव्ही बंधनकारक

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचे निर्देश

Pckhabar-  शहरातील काही भंगार व्यावसायिक चोरीच्या दुचाकी खरेदी करीत असल्याची कुणकुण पोलिसांना आहे. या पार्श्वभूमीवर भंगारच्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिले आहेत. तसेच भंगार व्यावसायिकांना यापुढे खरेदी-विक्री केलेल्या मालाची नोंद देखील ठेवावी लागणार आहे.

चाकण, चिखली, तळेगाव दाभाडे, एमआयडीसी भोसरी या परिसरात अनेक कारखाने आहेत. या कारखान्यांना लागणारे सुटे भाग तयार करणारे लघुउद्योग या भागात आहेत. सुटे भाग तयार करीत असताना त्यातून भंगारची निर्मिती होते. हे भंगार खरेदी करण्यावरून काही गुन्हेगारी टोळ्यांमध्ये घमासान झाल्याचे यापूर्वी समोर आले आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी त्याची दखल घेऊन भंगार माफियांवर खंडणीचे गुन्हे दाखल केले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व भंगार दुकानांमध्ये सीसीटीव्ही लावावेत, असे निर्देश पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *