Pune news: पार्थ पवार भाजपात येणार असले तरी आम्ही घेणार नाही – गिरीश बापट

Pune news: पार्थ पवार भाजपात येणार असले तरी आम्ही घेणार नाही – गिरीश बापट

Pckhabar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीरपणे फटकारल्यानंतर पार्थ पवार हे मोठा निर्णय घेतील. भाजपात जातील अशी जोरदार चर्चा रंगली असताना माजी मंत्री, पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी मोठे विधान केले आहे. पार्थ पवार भाजपात येत नाही आणि येणार असले तरी आम्ही घेणारही नाही असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. जय श्री राम फक्त पार्थ नाही म्हणत ते संपूर्ण जग म्हणतंय असेही ते म्हणाले.

पार्थ पवार यांनी अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. तसेच जय श्रीरामचा नारा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसशी विसंगत भूमिका त्यांनी घेतली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलानेच अशी भूमिका घेतल्याने चर्चेला उधाण आले होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ यांची चांगलीच कानउघाडणी केली होती. ‘माझ्या नातवाच्या मागणीला मी कवडीचीही किंमत देत नाही. तो अजून अपरिपक्व आहे’ असे जाहिरपणे खडसावले होते.

त्यावरून पार्थ नाराज झाले होते. काका, आत्या यांच्याशी बोलून आपण निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मागील दोन दिवसांपासून पवार कुटूंबियांकडून त्यांची समजूत काढली जात आहे. त्यांची नाराजी दूर झाली असल्याचे समजते. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे कळते.

दरम्यान, पार्थ पवार भाजपमध्ये जातील अशीही चर्चा रंगली होती. त्याला भाजप खासदार गिरीश बापट यांनी पूर्णविराम दिला आहे. पार्थ पवार भाजपात येत नाही आणि येणार असले तरी आम्ही घेणारही नाही असे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *