Pimpri News : रुपीनगर येथे दहावीच्या परिक्षेनिमित्त परीक्षार्थींना शुभेच्छा

Pimpri News : रुपीनगर येथे दहावीच्या परिक्षेनिमित्त परीक्षार्थींना शुभेच्छा..!

Pckhabar- आजपासून १० वी बोर्ड परीक्षा सुरू होत आहे, त्यानिमित्ताने ज्ञानदीप विद्यालय, रुपीनगर येथे विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले आणि शुभेच्छा देण्यात आल्या.शिवयोद्धा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अमोल तुकाराम भालेकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

” दहावीची बोर्ड परीक्षा म्हणजे आयुष्यातील पहिलीच मोठी परीक्षा. परंतु विद्यार्थ्यांनी दडपण न घेता, आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे. उत्तुंग यश संपादन करून शाळेचे, शिक्षकांचे आणि आईवडिलांचे नाव मोठे करावे “, अशा शुभेच्छा अमोल भालेकर यांनी याप्रसंगी दिल्या.प्रसंगी रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळ ज्ञानदीप विद्यालयाचे प्राचार्य सुबोधजी गलांडे सर,संस्थेचे अध्यक्ष शांतारामजी दगडु भालेकर मा. नगरसेवक प्रविणशेठ भालेकर,पोर्णिमाताई सोनवणे,शांताराम कोंडीबा भालेकर,धनंजयजी भालेकर,संगिताताई गोडसे,भागवतजी चौधरी साहेब,शरदजी भालेकर,कुंडलीकजी वराडी,सुभाषजी चौधरी,दशरथजी जगताप,सुधाकरजी दळवी,रमेशजी भालेकर,संपतशेठ भालेकर,सुर्यकांतजी भसे सर,शिंदे सर,हिवरे सर,गारगोटे सर,शेळके सर,जंगले सर,खामकर सर ,शंकरजी सोनवलकर,पद्माकरजी पाटील,शांताराम वारुळे,दिपक बोर्डे,योगेश सांवत, संस्थेचे सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.कार्यक्रम पार पाडण्यासाठी आशिष मोटे दर्पण येवले यांनी कष्ट घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *