Pimpri News : उद्योगनगरीतील पाच कामगारांना ‘गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार’ जाहीर

Pckhabar- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे दिले जाणारे प्रतिष्ठेचे ‘गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार ‘ नुकतेच जाहीर करण्यात आले. 51 कामगारांना ‘गुणवंत कामगार पुरस्कार’ जाहीर झाले आहेत. यामध्ये उद्योगनगरीतील पाच कामगारांचा समावेश आहे. रोख 25 हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र प्रदान असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
उद्योगनगरीतील किरण चंद्रकांत देशमुख (अल्फा लावल इंडिया प्रा.लि., दापोडी), हनुमंत रामचंद्र जाधव (लोकमान्य हॉस्पिटल, निगडी), बाळासाहेब लिंबराज साळुंके (टाटा मोटर्स कंपनी लि., पिंपरी), शिवाजी सुबराव पाटील (टाटा मोटर्स कंपनी लि., पिंपरी), दत्तात्रय पांडुरंग गायकवाड (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, दापोडी) हे कामगार या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा संघटन आदी क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या कामगारांना मंडळातर्फे पुरस्काराने गौरविण्यात येते. सर्व पुरस्कार्थीचे राज्याचे कामगारमंत्री हसन मुश्रीफ, कामगार राज्यमंत्री बच्चू कडू, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता वेद – सिंगल, कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी अभिनंदन केले आहे. कामगार कल्याण मंडळाच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळ्याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे.










Leave a Reply