Pmpml news: गणेश चतुर्थीपासून पीएमपीएमएलचा श्री गणेशा?

Pmpml news: गणेशचतुर्थी पासून पीएमपीएमएलचा श्री गणेशा?

Pckhabar: कोरोनामुळे मागील पाच महिन्यापासून बंद असलेली पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पीएमपीएमएल बस सेवा पुढील आठवड्यात सुरू होण्याची दाट शक्यता आहे.
22 तारखेला गणेश चतुर्थीला पीएमपीएलचा श्री गणेशा होण्याची शक्यता आहे. बससेवा चालू करण्यास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळे पाच महिन्यानंतर पीएमपीएल रस्त्यावर धावणार आहे. यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड मधील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 22 मार्चपासून देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. पुणे, पिंपरी- चिंचवड शहरात देखील कोरोनाचा कहर सुरू आहे. देशात अनलॉक तीनचा टप्पा सुरू आहे. पुणे, पिंपरी शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा देत असलेली पीएमपीएल बस मागील पाच महिन्यापासून बंद आहे. लॉकडाऊन काळात केवळ अत्यावश्यक सेवेसाठी बस रस्त्यावर धावत होत्या. अगोदरच तोट्यात असलेली आणि पाच महिने बस बंद असल्याने पीएमपीएलचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

अनलॉक तीनमध्ये पीएमपीएल बस सुरू करण्याचे नियोजन आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू करण्याचा पीएमपीएल प्रशासनाचा विचार आहे. यासंदर्भात पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे पीएमपीएल प्रशासनानं बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. पवार यांनीही तत्त्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळे 22 तारखेला म्हणजेच गणेश चतुर्थीला पीएमपीएलचा श्री गणेशा होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *