Pimpri Crime News : धक्कादायक, कागद पत्राचा गैरवापर करून 18 जणांच्या नावे घेतले कर्ज ; तिघांवर गुन्हा

Pimpri Crime News : धक्कादायक, कागद पत्राचा गैरवापर करून 18 जणांच्या नावे घेतले कर्ज ; तिघांवर गुन्हा

Pckhabar- तिघांनी मिळून १८ जणांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून त्यांच्या नावावर वेगवेगळ्या बँकांमधून कर्ज घेतले. ते कर्ज संबंधितांना न देता त्यांची फसवणूक दाखल करण्यात आला आहे. ही घटना मार्च २०२० ते २ डिसेंबर २०२० या कालावधीत आकुर्डीतील अनुकेशन कम्युनिकेशन येथे घडली.

याबाबत रोहिणी कळसकर यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रोहिणी उमेश कळसकर (वय ४४, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शैलेश खंडेलवाल, अमीर शेख, सद्दाम अन्वर अली शेख (रा. वाकड रोड) तिघांविरोधात विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी आणि अन्य १७ जणांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून वेगवेगळ्या बँकेतून कर्ज घेतले. कर्जाची रक्कम फिर्यादी अथवा अन्य लोकांना न देता त्या पैशांचा गैरवापर केला. फिर्यादी यांच्या नावावर घेतलेले ६० हजारांचे कर्ज त्यांना न देता आरोपींनी स्वत: वापरून फसवणूक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *