Dehu political News : देहू नगरपंचायतीच्या स्विकृत नगरसेवकपदी आनंदा काळोखे, रोहित काळोखे यांना संधी

Dehu political News : देहू नगरपंचायतीच्या स्विकृत नगरसेवकपदी आनंदा काळोखे, रोहित काळोखे यांना संधी

Pckhabar- तीर्थक्षेत्र देहू नगरपंचायतीच्या स्विकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आनंदा काळोखे आणि रोहित काळोखे यांना संधी दिली आहे.

17 सदस्य संख्या असलेल्या देहू नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता काबीज केली आहे. त्यानंतर आज (शुक्रवार) आमदार सुनील शेळके यांनी स्विकृत नगरसेवकपदी आनंदा काळोखे आणि रोहित काळोखे यांना संधी दिली आहे.

आनंदा काळोखे आणि रोहित काळोखे यांनी पदाला साजेसे काम करुन जनतेचे प्रश्न सोडविण्याबरोबरच जनमानसातील विश्‍वास अधिक दृढ करावा, अशी अपेक्षा आमदार शेळके यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *