Pimpri News : रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे बचत गटातील महिलांसाठी व्याख्यानाचे आयोजन

Pimpri News : रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे बचत गटातील महिलांसाठी व्याख्यानाचे आयोजन


Pckhabar- रोटरी क्लब ऑफ आकुर्डी यांच्या तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त बचत गटातील महिलांसाठी आर्थिक नियोजन कसे करावे या साठी मार्गदर्शन पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

या मध्ये रोटेरियन प्रशांत शेजवलकर यांनी मार्गदर्शन केले रोजच्या धावपळीत आर्थिक नियोजन कसे करावे तथा शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.

या कार्यक्रमा ते संयोजन रोटेरियन विजय तारक यांनी केले. कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ आकुर्डी  तर्फे अध्यक्ष गौरव शर्मा व डायरेक्टर सिमा शर्मा तसेच मेंबरशिप डायरेक्टर कल्याणी कुलकर्णी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचा मोहन नगर येथील बचत गटांच्या अंदाजे 30 ते 40 महिलांनी लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *