Pune News : माथाडी कामगारांचा आज अप्पर कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा
माथाडी कामगारांचे न्याय प्रश्न सोडविण्यास दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ पुणे व पिंपरी-चिंचवड माथाडी मंडळाच्या कार्यक्षेत्रामध्ये कामे करणा-या माथाडी कामगारांचा आज अप्पर कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा

Pckhabar- महाराष्ट्र शासनाच्या पुणे माथाडी, हमाल व इतर श्रमजिवी कामगार मंडळ आणि पिंपरी चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाच्या कार्यक्षेत्रामध्ये कामे करणा-या माथाडी कामगारांचे न्याय प्रश्न सोडविण्यास सतत दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ आज शुक्रवार दि. 11 मार्च, 2022 रोजी या दोन्ही माथाडी मंडळातील नोंदीत कामगारांचा शिवाजीनगर, पुणे येथिल अप्पर कामगार आयुक्त कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे जाहिर केले आहे.
पुणे माथाडी, हमाल व इतर श्रमजिवी कामगार मंडळ आणि पिंपरी-चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करणारे माथाडी कामगार महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सभासद असून, या कामगारांच्या न्याय प्रश्नांची सोडवणुक करण्याकडे अप्पर कामगार आयुक्त, माथाडी बोर्डाचे अधिकारी व संबंधित सतत दिरंगाई करीत आहेत. पुणे येथे माथाडी कामगारांसाठी टोळी पध्दत लागू करण्याकरीता तत्कालिन अप्पर कामगार आयुक्त श्री. चोळके यांनी तयार केलेल्या अहवालानुसार कार्यवाही करणे, या मार्केटमधील पालावाला महिला कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळणे तसेच याच मार्केटमध्ये अनोंदीत/डमी कामगार कामे करीत आहेत, त्यांच्यावर माथाडी मंडळाकडून कारवाई होणे, मे.उत्तरा फिडस प्रा.लिमिटेड, केतकावळे, जिल्हा-पुणे येथे काम करणा-या पुणे माथाडी बोर्डातील टोळी नं.1350 मधील माथाडी कामगारांना त्यांचे हक्काचे काम मिळवून देणे व माथाडी मंडळाने बेकायदेशिररित्या नोंदीत केलेल्या 06 कामगारांची नोंदणी रद्द करणे, शेतक-यांच्या पट्टीतून व्यापारी तोलाई कपात करतात, परंतु सदरील कपात केलेली तोलाईची रक्कम कांही व्यापारी माथाडी मंडळात भरणा करीत नाहीत, अशा व्यापा-यांवर माथाडी मंडळाकडून कारवाई करणे, पुणे व पिंपरी-चिंचवड माथाडी मंडळामध्ये अधिकारी व कर्मचारी यांची संख्या अपुरी असल्यामुळे कामगारांची दैनंदिन कामे होण्यास विलंब होत असून, अनेक गैरसोईस कामगारांना सामारे जावे लागत आहे, त्यामुळे दोन्ही माथाडी मंडळामध्ये तातडीने अधिकारी व कर्मचारी यांची संख्या वाढविणे, मे.टाटा मोटर्स लिमिटेड, पुणे येथिल पिंपरी-चिंचवड माथाडी मंडळाच्या टोळी नं.495 मधील माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्नांची सोडवणुक करणे, मे महिंद्रा लॉजिस्टीक, निघोज, चाकण येथिल पिंपरी-चिंचवड माथज्ञडी बोर्डाच्या टोळी नं. 677 मधील माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांची सोडवणुक करणे, पिंपरी- चिंचवड माथाडी मंडळातील नोंदीत कामगारांना नोंदणी, भविष्य निर्वाह निधीतून उचल, इन्शुरन्स व मंडळाकडून इतर मिळणा-या सर्व सेवा सुविधा यांची विहित कालावधीत मंडळाकडून पुर्तता करणे, पिंपरी- चिंचवड माथाडी मंडळातील नोंदीत कामगारांना नोंदणी, भविष्य निर्वाह निधीतून उचल, इन्शुरन्स व मंडळाकडून इतर मिळणा-या सर्व सेवा सुविधा यांची विहित कालावधीत मंडळाकडून पुर्तता करणे, पिंपरी चिंचवड व पुणे विभागातील बहुतांश कंपन्यांमध्ये फक्त नांवापुरती माथाडी कामगारांची नोंदणी केली जाते, या कंपन्यांमध्ये जादातर अनोंदीत कामगारच माथाडींची कामे करीत असतात, या अनोंदीत कामगारांना व कंपन्यांना ठेकेदार व गुंडांकडून संरक्षण दिले जाते, त्यामुळे माथाडी कायद्याची पायमल्ली होत आहे, अशा कंपनीमध्ये मंडळामार्फत भेट शेरे पारित करुन तेथील संपुर्ण कामगारांची माथाडी मंडळात नोंदणी करणे, पुणे व पिंपरी-चिंचवड माथाडी मंडळामार्फत माथाडी कामगारांच्या पगारातून 2% प्रमाणे कपात केला जाणारा टी.डी.एस. त्वरीत बंद करणे आदी प्रश्नांची सोडवणुक अप्पर कामगार आयुक्त आणि पुणे व पिंपरी-चिंचवड माथाडी मंडळाकडून होत नाही.

पुणे व पिंपरी-चिंचवड माथाडी मंडळातील कामगारांच्या प्रश्नांची सोडवणुक करण्याबद्दल अनेकवेळा निवेदने सादर केली, संयुक्त बैठका आयोजित केल्या, मात्र न्याय्य प्रश्नांची सोडवणुक होण्यास जाणुनबुजून दुर्लक्ष केले जात आहे, त्यामुळेच नाईलाजाने माथाडी कामगारांचा अप्पर कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणे भाग पडले असल्याचे माथाडी कामगार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी शेवटी पत्रकात म्हटले आहे व माथाडी कामगारांचे न्याय प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखिल दिला आहे.










Leave a Reply