Pune political News : पंजाबमध्ये आम आदमी पार्टीची एकहाती सत्ता; पुण्यात आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

Pune political News : पंजाबमध्ये आम आदमी पार्टीची एकहाती सत्ता; पुण्यात आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

Pckhabar- देशभर सध्या उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांची चर्चा आहे. पाच राज्यांपैकी 4 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आली आहे. तर, पंजाबमध्ये आम आदमी पक्ष हा तब्बल 92 जागांवर विजयी झाला आहे. पंजाबमधील या यशाचा पुणे आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर जल्लोष साजरा केला.

आत्ता दिल्लीनंतर पंजाबमध्ये देखील आम आदमी पक्षाचा मुख्यमंत्री असणार आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला मिळालेल्या यशानंतर पुण्यात आम आदमी पक्षाच्या कार्यालयाबाहेर जल्लोष साजरा करण्यात आला.

साखर वाटप करत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे. आता आम आदमी पक्ष हे राष्ट्रीय पक्ष होणार आहे. दोन राज्यात आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री हे असणार आहे. लवकरच राज्यातील स्थानिक निवडणुकांमध्येही आम आदमी पक्षाचा अशाच पद्धतीने निकाल लागेल, असा विश्वास यावेळी आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ता अभिजीत मोरे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *