Pimpri News : स्वच्छ सर्वेक्षणसाठी नागरिकांनी ‘या’ लिंकवर क्लिक करून फीडबॅक देण्याचे आवाहन

Pckhabar- स्वच्छता सर्वेक्षण २०२२ मध्ये पिंपरी चिंचवड शहर अव्वल होण्यासाठी शहरातील नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी ऑनलाइन फीडबॅकसाठी https://ss-cf.sbmurban.org/#/feedback या लिंकवर जावून अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

सध्या पिंपरी चिंचवड शहरात स्वच्छतेसाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आता शहरातील नागरिकांनी आपल्या पिंपरी चिंचवडसाठी ऑनलाइन सकारात्मक प्रतिक्रिया देण्याची महत्त्वाची भूमिका आहे . जेणेकरून शहराला जास्तीत जास्त गुण मिळू शकतील. ऑनलाइन फीडबॅकसाठी लिंक – https://ss-cf.sbmurban.org/#/feedback नागरिकांचा अभिप्राय महत्त्वाचा आहे.l










Leave a Reply