Big News : भाजपला धक्के सुरुच;  रवि लांडगे, संजय नेवाळे यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा

Big News : भाजपला धक्के सुरुच;  रवि लांडगे, संजय नेवाळे यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा

Pckhabar- भारतीय जनता पक्षाला धक्कावर धक्के बसत आहेत. भाजपचे
नगरसवेक रवि लांडगे आणि संजय नेवाळे यांनी आज आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.

यापूर्वी वसंत बोराटे, तुषार कामठे, माया बारणे, चंदा लोखंडे या चार नगरसेवकांनी भाजपाला रामराम ठोकला. भाजपा नेते आणि विधानसभेतील विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांनी थांबविण्याचा प्रयत्न करूनही रवि लांडगे यांनी पक्ष सोडल्याने आमदार महेश लांडगे आणि भाजपाला मोठा धक्का बसला.

दरम्यान, भाजपा सोडणारे बहुतांश नगरसवेक राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याने राष्ट्रवादी शहरात काही प्रमाणात वरचढ होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *