Dehu News : महिला दिनानिमित्त डॉक्टर, सिस्टर, आशावर्कर, महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार

Dehu News : महिला दिनानिमित्त डॉक्टर, सिस्टर, आशावर्कर, महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार

नगरसेविका पौर्णिमाताई विशाल परदेशी यांच्यातर्फे कार्यक्रमाचे आयोजन

Pckhabar-जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मावळ तालुक्याचे लोकप्रिय जनसेवक आमदार सुनिल अण्णा शेळके व सौ सारिकाताई सुनिल आण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाने श्रीक्षेत्र देहूच्या प्रथम नगरसेविका पौर्णिमाताई विशाल परदेशी यांच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र देहू येथील महिला डॉक्टर, सिस्टर, आशावर्कर, श्रीक्षेत्र देहू नगरपंचायत येथील महिला कर्मचारी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

सर्व महिलांची हिमोग्लोबिन मोफत तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्हा निरीक्षक रूपालीताई दाभाडे, श्री क्षेत्र देहू नगरपंचायतीच्या प्रथम नगराध्यक्ष स्मिताताई चव्हाण, उपनगराध्यक्षा रसिकाताई काळोखे राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष सौ वैशालीताई टिळेकर प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य अधिकारी डॉक्टर किशोर यादव, बाळासाहेब काळोखे सरचिटणीस मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व क्षेत्र देहू नगरपंचायतीच्या सर्व नगरसेविका व नगरसेवक उपस्थित होते.

या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व महिला व पुरुष पदाधिकारी देहूतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राध्यापक विकास कंद यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *