Bhosari News : कुटुंब व्यवस्थेचा कणा असलेली स्त्री हा आदर्श समाज जीवनाचा पाया आहे -डॉ.अशोककुमार पगारिया

Bhosari News : कुटुंब व्यवस्थेचा कणा असलेली स्त्री हा आदर्श समाज जीवनाचा पाया आहे -डॉ.अशोककुमार पगारिया

Pckhabar-काळानुरूप परस्थिती बदलत आहे. हा बदल रूढी परंपरेशी प्रमाण मानून बदलत्या परिस्थितीच्या गरजा लक्षात घेऊन स्वतः मध्ये बदल घडवून आणणारी स्त्री ही कुटुंब व्यवस्थेचा कणा आहे, तर कुटुंब व्यवस्थेचा कणा असलेली स्त्री हा आदर्श समाज जीवनाचा पाया आहे. असे मत प्रा.डॉ.अशोककुमार पगारिया यांनी व्यक्त केले.

आपल्या कर्तृत्वाने आपल्या क्षेत्रात विशिष्ट उंची गाठलेल्या स्त्रियांचा सन्मान रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी व प्रीतम प्रकाश महाविद्यालयाने जागतिक महिला दिनाचे आयोजन केले होते. कर्तृत्वान महिलांमध्ये उद्योजिका कविता शेठीया , बालरोग तज्ञ डॉ .स्वप्नाली धोका, आरोग्य विभागाच्या डॉ.सपना उपाध्याय , प्राचार्य अकिला इनामदार ,स्त्री रोगतज्ञ डॉ. गौरी पाटील, पत्रकार मा.सुवर्णा गवारे, ज्येष्ठ कवयित्री मा.संगीता झिंजुरके, , यांचा महिला दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला.
महाविद्यालयात अध्यापनाचे काम करणाऱ्या डॉ.स्वाती वाघ, प्रा.विभा ब्राह्मणकर, प्रा.महालक्ष्मी शिरसाठ ,प्रा. रूपाली आगळे, यांना देखील या कार्यक्रमात सन्मानीत करण्यात आले.
संस्थेचे उपाध्यक्ष मा. विलासशेठ पगारिया यांनी आपल्या मनोगतात महिलांचा मान-सन्मान ठेवणे हा चारित्र्यसंपन्न समाजाचा पाया आहे.या महिलांनी आपल्या कार्यातून समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. अशा या महिलांच्या कर्तृत्वाला माझा सलाम असे भावोद्गार व्यक्त केले.
डॉ.अकिला इनामदार यांनी सत्काराला उत्तर देताना आजही समाजामध्ये पाहिजे तेवढे चांगले वातावरण नाही. तरीसुद्धा घरच्यांची साथ व माझे प्रयत्न यामुळे मी आज पंचवीस वर्षाहून अधिक अध्यापन क्षेत्रात काम करु शकले.
डॉ.गौरी पाटील, यांनी आरोग्य क्षेत्रात काम करताना ज्या काही अंधश्रद्धा आजही समाजात मानल्या जातात त्या दूर करणे आपले कर्तव्य आहे अशी भावना व्यक्त केली.
पत्रकार मा.सुवर्णा गवारे यांनी उपेक्षित समाजाला आधार देणे. त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठविणे हे मी माझ्या कामाचे आद्यकर्तव्य मानते.
आरोग्य क्षेत्राशी संबंधित असलेल्या डॉ.स्वप्नाली धोका,यांनी आरोग्य बरोबर शिक्षण क्षेत्रात काम करताना गरज आणि प्रयत्न याच्या समन्वयसाधून मी काम करत गेले. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मला वेगवेगळे प्रयोग करता आले.

भाव-संवेदना यांना मानाच्या पातळीवर असाधारण महत्व आहे. आनंद आणि दुःख आपल्याला पेलता आले पाहिजे. अशी भावना कवयित्री संगीता झिंजुरके यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी आपल्या काव्य गायनातून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
महिला दिनाचे आयोजनामध्ये मा. प्राचार्य सदाशिव कांबळे, प्रशासकीय अधिकारी प्रा. भास्कर पांडुरंग, परीक्षा विभाग प्रमुख डॉ.विजय निकम, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. सुधाकर बैसाणे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रमुख प्रा.सचिन पवार, डॉ. हनुमंत शिंदे, प्रा.प्रवीण मस्के,प्रा.उमेश लांडगे,प्रा.प्रशांत रोकडे, ग्रंथपाल राजेश कुंभार, यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रमुख प्रा. सचिन पवार केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सत्कारार्थीचा परिचय परीक्षा विभाग प्रमुख डॉ.विजय निकम यांनी करून दिला.तर आभार राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा.सुधाकर बैसाणे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *