IPL News : चेन्नई-कोलकाता लढतीने वाजणार आयपीएलचे बिगुल
पुण्यातील गहुंजे मैदानावर १५ लढती रंगणार

Pckhabar- इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या लोकप्रिय टी-२० क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक रविवारी जाहीर करण्यात आले आहे. २६ मार्चला चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील लढतीने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर या स्पर्धेचा बिगुल वाजणार आहे.

आयपीएलच्या १५व्या ‘ हंगामातील शेवटचा साखळी सामना २२ मे रोजी संध्याकाळी ७.३० वाजता वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्जचे हे दोन संघ अखेरच्या साखळी लढतीत आमनेसामने असतील. यावर्षी लीगमधील सर्व सामने देशातच खेळवले जाणार आहेत. लीग राउंडमधील सर्व ७० सामने मुंबई आणि पुण्याच्या स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. मुंबईत वानखेडे, डीवाय पाटील आणि ब्रेबॉर्न या तीन स्टेडियमवर सामने होणार आहेत.
पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर १५ लढती IPL रंगणार आहेत. सर्व संघ वानखेडे आणि डी. वाय. पाटील स्टेडियमवर प्रत्येकी चार चार सामने खेळतील. त्याशिवाय, पुणे आणि ब्रेबॉर्न प्रत्येक संघाचे तीन तीन सामने होतील. प्ले ऑफ संबंधी कुठलाही निर्णय झालेला नाही. अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल. सर्व १० संघ प्रत्येकी १४ सामने खेळणार आहेत.










Leave a Reply