
Dehu News : देहूगावातील संदीप तिकोणे यांची डब्ल्यू.डब्ल्यू.ईसाठी निवड झाल्याबद्दल सन्मान
Pckhabar- देहूगावातील संदीप अरुण तिकोणे( बारूद )यांची नुकतीच यु.के.मधील डब्ल्यू.डब्ल्यू.ई .स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

संदीप आज आंतरराष्ट्रीय पातळीवर बारुद नावाने डब्ल्यू. डब्ल्यू.एफ.खेळातील एक प्रसिद्ध खेळाडू आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून देहू गावातून सुरू झालेला त्याचा हा प्रवास…..आज डब्ल्यू.डब्ल्यू.एफ खेळातील आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू व प्रशिक्षक म्हणून यशस्वीतेच्या शिखरावर पोहोचला आहे.
त्याच्या यशस्वीतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. संदीपचा हा जीवनप्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. संदीपचा कार्याचा मनापासून अभिमान वाटतो. या कार्याच्या गौरवार्थ आदर्श शिक्षक माणिक जाधव सर यांच्या हस्ते संदीप तिकोणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. विकास कंद, सचिन साळुंके आदी उपस्थित होते.










Leave a Reply