Pune News : घरखरेदी महागणार; १ एप्रिलपासून ‘मेट्रो सेस’ लागणार

Pune News : घरखरेदी महागणार; १ एप्रिलपासून ‘मेट्रो सेस’ लागणार


Pckhabar-  पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांतील वाहतूककोंडीची समस्या दूर करण्यासाठी मेट्रोचे जाळे उभारले जात आहे. मेट्रो धावणाऱ्या या शहरांत घर खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्यांना आता अधिकचा 1 टक्का कर भरावा लागणार आहे. मेट्रो प्रकल्प राबविण्यात येणाऱ्या शहरांत घर खरेदीवर १ एप्रिलपासून १ टक्का मेट्रो सेस आकारण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

लवकरच नवा उपकर लागू करण्यात येणार आहे. नगर विकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी घर खरेदी करताना १ टक्का मेट्रो सेस भरावा लागणार असल्याचे सुतोवाच केले आहेत. मेट्रो उपकरातून मिळणारा महसूल मेट्रो, पूल, उड्डाणपूल यासारख्या वाहतुकीशी संबंधित प्रकल्पांसाठी वापरण्यात येणार आहे.

क्रेडाई या बांधकाम व्यवसायिकांच्या संघटनेनं मेट्रो उपकर न लावण्याची विनंती केली आहे. मेट्रो उपकर लावल्यास घर खरेदीत घट होईल. परिणामी सरकारला महसुलातून अपेक्षित लक्ष्य साध्य करणं शक्य होणार नाही, असे त्यांनी म्हटलं आहे.

पुण्यात ७ टक्के स्टॅम्प ड्युटी

‘मेट्रो सेस’ मुळे मुंबईत घर खरेदी करताना १ एप्रिलपासून ६ टक्के स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल. सध्या घर खरेदी करताना ५ टक्के स्टॅम्प ड्युटी भरावी लागत आहे. तर, पुणे, ठाणे आणि नागपुरात १ एप्रिलपासून ७ टक्के ड्युटी भरावी लागेल. राज्य सरकारकडे निधीची कमतरता असल्याने मेट्रो उपकर लावण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *