Bhosari political News : नगरसेवक रवि लांडगे यांचा भाजपच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा


Bhosari political News : नगरसेवक रवि लांडगे यांचा भाजपच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा
Pckhabar- भोसरी विधानसभा मतदारसंघातील बिनविरोध निवडून आलेले भाजप नगरसेवक रवि लांडगे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पटील यांना पत्र लिहून पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.

या पत्रात त्यांनी पक्ष सोडण्याची कारणे देताना आमदार महेश लांडगे यांच्या कारभाराबाबत अनेक गंभीर आरोप देखील केले आहेत. रवि लांडगे यांचे कुटुंब भाजपचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात. त्यांनी भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्याने भोसरी विधानसभा मतदारसंघात मोठा राजकीय भूकंप झाला आहे.

रवि लांडगे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *