Pimpri News : एस.टी. कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याची विनंती

Pckhabar- सामान्य प्रवाशांचे हाल लक्षात घेऊन एस. टी. कर्मचाऱ्यांनी तातडीने संप स्थगित करून कामावर रुजू व्हावे, असे आवाहन स्वराज अभियान संघटनेने केले आहे.

परिवहन महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा आणि पुढील वेतन आयोग जे मंजूर होतील ते ताबडतोब लागू करावे. एस. टी. चे खासगीकरण आणि जागांची विक्री करण्याची स्थिती कामगार निर्माण करीत आहेत, अशी भावना आहे. आज राज्यात रोजगारांची वानवा आहे, त्यात आपण स्वत:हून १ लाख कुटुंबांना बेरोजगारीच्या खाईत लोटत आहोत.
त्यामुळे संप मागे घेऊन कामावर रुजू व्हावे, असे आवाहन स्वराज अभियानने एस. टी. कर्मचाऱ्यांना केले आहे. याबाबतच्या पत्रावर मानव कांबळे, ललित बाबर, अण्णासाहेब खंदारे, सुभाष लोमटे, इस्माईल समडोळे, वंदना शिंदे, इब्राहिम खान, संजीव साने, ओमप्रकाश कलमे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.










Leave a Reply