Pimpri News : महाशिवरात्री यात्रा स्पेशल बससेवेमुळे एका दिवसात ‘पीएमपीएल’ला मिळाले २ लाख ६५ हजारांचे उत्पन्न

Pimpri News : महाशिवरात्री यात्रा स्पेशल बससेवेमुळे एका दिवसात ‘पीएमपीएल’ला मिळाले २ लाख ६५ हजारांचे उत्पन्न


Pckhabar- महाशिवरात्रीनिमित्त निगडी ते भीमाशंकर या मार्गावर धावलेल्या पीएमपीएलच्या बससेवेतून एका दिवसात दोन लाख ६५ हजार ३३४ रुपयांचे उत्पन्न मिळाले. या बससेवेमुळे भाविकांना महाशिवरात्रीनिमित्त भीमाशंकर येथे दर्शन घेणे सोयीचे झाले.

निगडी आगाराचे उपमुख्य व्यवस्थापक शांताराम वाघेरे यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, पीएमपीएलच्या वतीने निगडी ते भीमाशंकर अशी बससेवा पुरविण्याचा निर्णय अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी घेतला. मुख्य वाहतूक व्यवस्थापक (ऑपरेशन) दत्तात्रेय झेंडे यांनी यात्रेकरिता १० बसगाड्यांचे नियोजन केले.

निगडी आगार व्यवस्थापक यशवंत हिंगे यांच्या नियंत्रणात १० बसगाड्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे रवाना केल्या. निगडी ते भीमाशंकर हे अंतर ९६ किमी असून, एवढ्या दूरपर्यंत पीएमपीएमएलने पहिल्यांदाच प्रवासीसेवा पुरवली. २८ फेब्रुवारीपासून दुपारी १२ वाजता सुरू केलेले संचलन अखंड ३६ तास दि. १ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्यामुळेच एका दिवसात दोन लाख ६५ हजार ३३४ रुपयांचे उत्पन्न मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *