Pcmc Election News : राष्ट्रवादी काँग्रेसला लागली कामाला, राष्ट्रवादीने सर्व प्रभागातील इच्छुकांचे अर्ज मागवले

Pcmc Election News : राष्ट्रवादी काँग्रेसला लागली कामाला, राष्ट्रवादीने सर्व प्रभागातील इच्छुकांचे अर्ज मागवले


Pckhabar- आगामी पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल कधीही वाजण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
कामाला लागला आहे. शहरातील सर्व ४६ प्रभागातील इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व ४६ प्रभागातील इच्छुक उमेदवारांनी ७ ते १३ मार्च २०२२ या कालावधीत सकाळी दहा ते सांयकाळी चार या वेळेत राष्ट्रवादी पक्षाच्या पिंपरी येथील खराळवाडी कार्यालयात छापील अर्ज भरून जमा करावेत.

यासाठी अर्जासोबत उमेदवारांनी कार्यअहवाल देणे आवश्यक आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *