Big News : राज्य सरकारला मोठा धक्का; मागासवर्ग आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्टाने फेटाळला

Big News : राज्य सरकारला मोठा धक्का; मागासवर्ग आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्टाने फेटाळला

Pckhabar- ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला असून ओबीसी आरक्षणाचा मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. आगामी महापालिका निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होण्याची शक्यता आहे.

राज्य मागासवर्गाच्या अहवालात ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधीत्वाबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले. त्याशिवाय, स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय ओबीसी प्रतिनिधीत्वाची माहिती अहवालात नव्हती. त्याशिवाय, कोणत्या कालावधीतील माहितीच्या आधारे हा अहवाल तयार केला याबाबतही कोणतीही स्पष्टता नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले.

या पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय पार पाडाव्यात असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. पुढील निर्देश येईपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थातील निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्यात याव्यात असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *