Pimpri News : ‘प्रधानमंत्री आवासच्या लाभार्थ्यांना स्वहिस्सा भरण्यास मुदतवाढ’

Pimpri News : ‘प्रधानमंत्री आवासच्या लाभार्थ्यांना स्वहिस्सा भरण्यास मुदतवाढ


Pckhabar- प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र ठरलेले लाभार्थी आणि प्रथम स्वहिस्सा रक्कम भरलेल्या च-र्होली प्रकल्पातील लाभार्थ्यांना पुढील ४० टक्के आणि बोऱ्हाडेवाडी प्रकल्पातील पात्र लाभार्थ्यांना पुढील ८० टक्के व बोऱ्हाडेवाडी प्रकल्पातील पात्र लाभार्थ्यांना ८० टक्के स्वहिस्सा रक्कम भरण्याची मुदत १७ मार्चपर्यंत वाढविण्यास महापालिकेने मान्यता दिली आहे. या मुदतीत लाभार्थ्यांनी स्वहिस्सा रक्कम भरावी, असे आवाहन केले आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेत चोली प्रकल्पात ४० टक्के आणि बोऱ्हाडेवाडी
प्रकल्पात ८० टक्के स्वहिस्सा रक्कम भरण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन आणि पुनर्वसन विभागामध्ये चलन प्राप्त करून स्वहिस्सा रक्कम भरावी, अन्यथा लाभ रद्द करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी झोपडपट्टी निर्मूलन आणि पुनर्वसन विभागाचे सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

याबाबतची माहिती आणि निवड झालेल्या लाथार्थ्यांच्या नावाची यादी चिंचवडगाव येथील भाजीमंडई शेजारी असलेल्या झोपडपट्टी निर्मूलन आणि पुनर्वसन विभाग कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *