Pimpri political news : महापालिका निवडणुकीत प्रहारचे नगरसेवक निवडून येणार : राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू

Pimpri political news : महापालिका निवडणुकीत प्रहारचे नगरसेवक निवडून येणार : राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू


Pckhabar- पिंपरी चिंचवड शहरात प्रहार जनशक्ती पक्ष मजबूत होत असल्याने २०२२ सार्वत्रिक निवडणुकीत प्रहारचे नगरसेवक निवडून येतील, असा विश्वास राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील पिंपरी,मोरवाडी येथील अपंग भवनास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भेट दिली आणि तेथील परिस्थितीचा आढावा घेतला त्यानंतर भीमसृष्टी भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रहार जनशक्ती पक्ष पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष विनोद गायकवाड यांच्या जनसपंर्क कार्यालयास भेट देऊन शहरातील पक्षाच्या बांधणी संर्भात आढावा घेतला. पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली व सर्वाना जोमाने पक्ष बांधणी साठी मार्गदर्शन करत आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पिंपरी चिंचवड शहरात प्रदेश अध्यक्ष अनिल गावंडे आणि शहराध्यक्ष विनोद गायकवाड यांच्या नेतृत्वात आगामी निवडणुकीमध्ये प्रहार जनशक्ती पक्ष सहभाग घेईल आणि उमेदवार देऊन फक्त नगरसेवक नाही तर जनतेचे प्रहार सेवक निवडून आणू  अशी भूमिका त्यांनी घेतली .

महानगरपालिकेतील भ्रष्टाचार वाढत आहे अपंगांना न्याय वेळेवर मिळत नाही ,योजना त्यांच्या पर्यंत पोहचत नाही कंत्राटी कामगारांची पिळवणूक होते ह्या बाबीकडे स्वतः लक्ष देणार व त्यासंदर्भात सर्व पदाधिकाऱ्यांनी सजग राहून जनसेवा करावी अशा सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या .

यावेळी शहराध्यक्ष विनोद गायकवाड यांनी असे मत व्यक्त केले कि प्रहार जनशक्ती पक्ष हा जनसामान्यांचा पक्ष असून जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण,महिला व बालविकास,इतर मागास बहुजन कल्याण विभाग,कामगार मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  साहेब यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनात शहरात जास्तीत जास्त उमेदवार देऊन निवडून येण्यासाठी अथक मेहनत घेऊन मोर्चेबांधणी करू आणि महानगरपालिकेत प्रहारचे नगरसेवक पाठवणारच असे जाहीर केले .

यावेळी शहराध्यक्ष विनोद गायकवाड यांनी राजमंत्री बच्चू भाऊ कडू यांचेकडे अपंग बांधवांच्या कार्यासाठी मदत निधी ५ हजार रुपये धनादेश सुपूर्द केला.  स्वीय साह्यक गौरव जाधव प्रहार जनशक्ती  पक्षाचे पिंपरी चिंचवड शहरध्यक्ष विनोद गायकवाड नंदकिशोर जगदाळे, संजय गायखे,  दत्तात्रय भोसले, अपंग क्रांतिच्या महिला अध्यक्षा संगिता जोशी, महासचिव ऋषिकेश उमाळे ,प्रवीण जाधव ,राहुल आखाडे ,विशाल कांबळे  व इतर पदाधिकारी सदस्य उपस्थित होते .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *