Pimpri Crime News : ऑनलाइन मागविले लॅपटॉप आले मिठाचे पुडे अन् कागद

Pckhabar- ऑनलाइन लॅपटॉप खरेदी केल्यानंतर त्याचे पार्सल घरी आले. मात्र, पार्सलमध्ये लॅपटॉपऐवजी मिठाचे पुडे व कागद पाठवून फसवणूक केल्याचा प्रकार पिंपरी येथे घडला.

डॉ. जना प्रणित जोशी (वय ४३, रा. सुखवानी कॅम्पस, वल्लभनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० फेब्रुवारी रोजी फिर्यादी डॉ. जना यांच्या पतीने ६३ हजार ९९० रुपये किमतीचा लॅपटॉप अॅमेझॉन इंडिया या कंपनीतून ऑनलाइन खरेदी केला. त्यानंतर अॅमेझॉन कंपनीच्या डिलिव्हरी एजंटने लॅपटॉप म्हणून दिलेले पार्सल उघडून पहिले असता त्यामध्ये लॅपटॉपऐवजी दोन किलो मिठाच्या पुड्या व खाकी कागद होता. लॅपटॉपचा अपहार करून डॉ. जना व त्यांच्या पतीची ॲमेझॉन कंपनीतील एकाने फसवणूक केली.
पिंपरी पोलीस तपास करत आहेत










Leave a Reply