SSC, HSC Exam News : पिंपरी- चिंचवड शहरात दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी ६४ मुख्य केंद्रे

SSC, HSC Exam News : पिंपरी- चिंचवड शहरात दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी ६४ मुख्य केंद्रे

बारावीचे १७ हजार ४९० तर दहावीचे
२० हजार ७०० विद्यार्थी देणार परीक्षा

Pckhabar-माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे चार मार्चपासून बारावी, तर १५ मार्चपासून दहावीच्या परीक्षेला प्रारंभ होत आहे. यासाठी मुख्य आणि उपकेंद्रांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. शैक्षणिक लेखन साहित्य एकूण ६४ मुख्य केंद्रांच्या सुरक्षा खोल्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. शहरात बारावीसाठी १९ आणि दहावीसाठी ४५ मुख्य केंद्र उपलब्ध आहेत.

शुक्रवारी (दि. ४) बारावीचा पेपर असल्याने शहर स्तरावर परीक्षा केंद्रावर लागणारे सर्व साहित्य पोहोचविण्यात आले आहे. स्कूल बोर्डाद्वारे सर्वच सहायक केंद्र संचालकांना पंधरा दिवसांपूर्वी पत्र पाठवून संपर्क साधत कामासंदर्भात निर्देश देण्यात यायचे. मात्र, दोन वर्षांपासून त्याची जबाबदारी ‘कस्टडियन’ कडे देण्यात आली आहे. प्रत्येक कस्टडियनच्या हाताखाली १५ ते १७ केंद्रांची जबाबदारी आहे. त्यानुसार कस्टडियन यांनी सहायक केंद्र संचालकांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करत साहित्य वेळेत पोहोचवले आहे.

कोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी, आलेख, नकाशा, हॉलोक्राफ्ट स्टिकर्स, सिटिंग प्लॅन ए. बी. लिस्ट, विषयनिहाय माध्यमनिहाय बारकोड आदी परीक्षेचे साहित्य मुख्य परीक्षा केंद्रावर कस्टडीत आहे. परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या उत्तरपत्रिकांचा पुनर्वापर आणि इतर साहित्याचा गैरवापर होऊ नये, यासाठी ज्या ज्या ठिकाणी साहित्य आहे, त्याची गोपनीयता ठेवण्यात आली आहे. या वर्षी बहुतांश केंद्रावर वेळेत साहित्य पोचलेले आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी लागणारे शैक्षणिक साहित्य सध्या परीक्षा केंद्राच्या ताब्यात देण्यात आले आहे. मात्र, साहित्य वाटपानंतर ते सांभाळण्याची मुख्याध्यापकांवरील जबाबदारी वाढली आहे.

बारावीसाठी १९ मुख्य केंद्र, तर ८६ उपकेंद्रे आहेत. दहावीसाठी ४५ मुख्य केंद्रे आणि ९५ उपकेंद्रांची सोय आहे. त्यासाठी पाच भरारी पथके व परीक्षकांची नियुक्ती पूर्ण झाली आहे. संलग्न शाळा, महाविद्यालयांना उपकेंद्रांची तयारीही अंतिम टप्प्यात आहे. परीक्षार्थ्यांना बसण्याचे बेंच, कक्षात पंखे, लाइट, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आदी भौतिक सुविधांचे नियोजन पूर्ण आहे.

■ इयत्ता : बारावी

■ मुख्य केंद्रे : १९, उपकेंद्रे : ८६
विद्यार्थी संख्या १७ हजार ४९०

■ इयत्ता दहावी

■ मुख्य केंद्रे : ४५, उपकेंद्रे : ९५
■ विद्यार्थी संख्या : २० हजार ७००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *